Laxman Hake : राज्य मागास आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांचा तडकाफडकी राजीनामा, कारणही आलं समोर…

Laxman Hake : राज्यात सध्या मराठा आरक्षणासाठी वाद होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी मराठा समजाचे साखळी उपोषण सुरू आहे. याच पार्शभूमिवर राज्य मागासवर्ग आयोगाच्या आणखी एका सदस्याने राजीनामा दिला आहे. पुण्यातील राज्य मागासवर्ग आयोगाकडे लक्ष्मण हाके यांनी आपला राजीनामा सादर केला आहे. हाके हे जून २०२१ पासून आयोगाचे सदस्य होते.

आयोगाच्या बैठकीत वैचारिक मतभेदांमुळे व्यथित होऊन आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचे हाके यांनी म्हटले आहे. आयोगाच्या अध्यक्षांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही हाके यांनी राजीनामाची प्रत पाठवली आहे.यांच्या राजीनाम्यामुळे राज्याला मोठा झटका बसला आहे. Laxman Hake
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच बालाजी किल्लारीकर यांनी राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. मराठा समाजाला वेगळे आरक्षण मिळाले नाही तरी ईडब्ल्यूएससारखा विशिष्ट वर्ग तयार करून मराठा समाजाला आरक्षण देता येईल, अशी आपली भूमिका होती.

पण सरकारच्या आणि आपल्या भूमिकेत फरक असल्याने राजीनामा दिल्याचे बालाजी किल्लारीकर म्हणाले होते. यापूर्वी प्रा. डॉ. संजीव सोनावणे यांनीही सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे.
