वैशाली नागवडे यांचा वाढदिवस तालुक्यात चर्चेचा विषय…!

पुणे : जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या फायरब्रॅण्ड महिला नेत्या वैशाली नागवडे यांचा वाढदिवस तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.शुक्रवारी रात्रीपासून नागवडे यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शुभेच्छा देण्यात आल्याचे दिसुन येत होते.
यात सर्वपक्षीय नेत्यांचा समावेश होता हे विशेष वैशाली नागवडे यांनी गेल्या विधानसभेच्या निवडणुकी पासून दौंड तालुक्यात आपला जनसंपर्क वाढवला असून त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिसत आहे.
दौंड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत असणारी बंडाळी आणि नागवडे गट या या गोष्टींची नेहमी चर्चा होत असली तरी वैशाली नागवडे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस मधील सर्वच कार्यकर्ते नि सोशल मीडियावर शुभेच्छा देताना पाहायला मिळत असून तालुक्यातील भाजपा च्या प्रमुख कार्यकर्ते नी देखील नागवडे यांना शुभेच्छा देण्यात आघाडी घेतली आहे.
सर्वसामान्य कुटुंबातील महिला ते महानंदा दुग्ध संघाच्या अध्यक्ष पर्यंत वैशाली नागवडे यांचा राजकिय प्रवास थक्क करणारा आहे राज्यातील वरिष्ठ नेते मंडळींच्या बरोबर असेलला जनसंपर्क यात ज्येष्ठ नेते शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे यांचा समावेश असून त्यांच्याशी नागवडे यांचा असलेला जनसंपर्क दौंड तालुक्यात चर्चेचा विषय राहिला आहे.
नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत वैशाली नागवडे या राहुल गांधी यांच्या बरोबर सहभागी झाल्याने चर्चेत आल्या होत्या त्यातच त्यांच्या वाढदिवसाला मिळणारा प्रतिसाद पाहता वैशाली नागवडे या भविष्यात दौंड तालुक्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी राहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.