रुबी हॉस्पिटल क्लिनिकमध्ये काम करणार्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी ! व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल..!!
पुणे : रूबी हॉल क्लिनिकमध्ये काम करणार्या महिलेचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी रूबी हॉस्पीटलच्या एचआर व्यवस्थापक व तांत्रिक कर्मचाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यवस्थापक प्रभाकर श्रीवास्तव आणि कर्मचारी बाळकृष्ण शिंदे (रा. बिबवेवाडी) यांच्याविरूध्द कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात भादंवि 354, 509, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रूबी हॉस्पीटलमध्ये काम करणार्या 45 वर्षीय पिडीत महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला या रूबी हॉस्पीटलमध्ये काम करत असताना बाळकृष्ण शिंदेने त्यांना अश्लील हातवारे करून डोळा मारून माझेशी शरीर संबंध ठेव नाही तर मी तुला हॉस्पीटलच्या कामावर टिकु देणार नाही .असे बोलून त्यांचा विनयभंग केला. सदरील कृत्याबाबत फिर्यादीने हॉस्पीटल प्रशासनाकडे तक्रार अर्ज केला. त्यानंतर संबंधित महिलेने पोलिसांकडे धाव घेतली आहे.
त्यानुसार शिंदे आणि श्रीवास्तव यांच्यावर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक इंगोले करीत आहेत.