ST Bus : ऐन दिवाळीत प्रवाशांना फटका! एसटी महामंडळाकडून तिकीट दरात मोठी वाढ, जाणून घ्या..


ST Bus : एसटी महामंडळाने ऐन दिवाळी हंगामात भाडेवाढ जाहीर केली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावरच होणाऱ्या गर्दीचा फायदा उठविण्यासाठी एसटी महामंडळाने आपल्या सर्व बस प्रकारच्या तिकीट दरात सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

ही दरवाढ मंगळवारपासून (ता. ७) लागू होणार आहे. दरवाढ २७ नोव्हेंबरपर्यंत कायम असेल. या नवीन दरानुसार आता छत्रपती संभाजीनगर ते पुणे हे प्रवास भाडे ५५५ आणि छत्रपती संभाजीनगर ते मुंबई हे भाडे ९१५ रुपये असेल. ST Bus

नवीन दरवाढीमुळे प्रवाशांना छत्रपती संभाजीनगरातून पुणे-मुंबईला जाण्यासाठी साध्या बससह शिवशाहीने जाण्यासाठी ५० ते १०० रुपये जास्त मोजावे लागतील. ही दरवाढ साधी, जलद, निमआराम, साधी शयन आसनी, वातानुकूलित शिवाई, शिवशाही या बससाठी असेल, हे लक्षात घ्या. त्यामुळे जर तुम्ही येत्या काही दिवसात बसने प्रवास करणार असाल तर तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागतील.

दिवाळी हंगामाचा फायदा उठविण्यासाठी दरवर्षी एसटी महामंडळ अशा प्रकारची भाडेवाढ करीत असते. अशा प्रकारची भाडेवाढ करण्याची एसटीला मूभा देण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही उन्हाळी अथवा दिवाळी सुट्यानिमित्त एसटी महामंडळाची अशा प्रकारचे दरवाढ करीत असते.

एसटी महामंडळाला कोरोनाकाळात मोठा आर्थिक फटका बसला. त्यातच लांबलेला कामगारांचा संप यामुळे एसटीचे काम आणखीनच गर्तेत अडकले. एसटी महामंडळाने ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास आणि महिलांना अर्ध्या तिकीटात प्रवास सवलत जाहीर केल्याने एसटीचे प्रवासी वाढले आहेत. त्यामुळे एसटी महामंडळ हळूहळू आर्थिक गर्तेतून बाहेर पडत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!