Arvind Kejriwal : राजकारणातील सर्वात मोठी बातमी! दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज होणार अटक?

Arvind Kejriwal : कथित मद्य घोटाळाप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावलं आहे. त्यामुळे आज केजरीवाल यांची ईडी कार्यालयात चौकशी होणार आहे. तसेच केजरीवाल यांना अटक होऊ शकते, असा दावा आम आदमी पक्षाने केला आहे.
भाजपा आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना तुरुंगात टाकून पक्ष संपवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही आपच्या नेत्यांनी केला आहे. दिल्लीच्या राजकारणात गाजत असलेल्या कथित मद्यधोरण घोटाळ्यामध्ये आम आदमी पक्ष अधिकाधिक अडचणीत सापडत चालला आहे. Arvind Kejriwal
ईडीने या प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि खासदार संजय सिंह यांना अटक केली आहे. आता अरविंद केजरीवाल यांची ईडीकडून चौकशी होणार आहे.
मुख्यमंत्री अरविंद केजरील यांना पीएमएलए कायद्यांतर्गत समन्स बजावण्यात आलं आहे. ईडीने केजरीवाल यांना समन्स पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी सीबीआयने या प्रकरणात केजरीवाल यांची चौकशी केली होती. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नाव आरोपी म्हणून नाही.
यामध्येच आपचे ज्येष्ठ नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले, केंद्र सरकारचे एकच उद्दिष्ट आहे. कोणत्याही किंमतीत आम आदमी पार्टीला संपवणे. यासाठी ते कोणतीही कसर सोडत नाहीत. अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात पाठवून आम आदमी पक्षाचा नाश करण्याचा विचार असल्याचं देखील ते म्हणाले आहेत