Pune Crime News : व्हिडीओ लाईक करत असाल तर ही बातमी वाचा! पुण्यातील तरुणाने Youtube व्हिडीओ लाईक केले अन्..

Pune Crime News पुणे : सायबर ठग वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरुन लोकांचा फसणूक करत असतात. सध्या असाच एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. ज्यामध्ये YouTube चे व्हिडीओ लाईक करण्याच्या नावाखाली एका व्यक्तीला ५० लाखांचा फटका बसला आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Crime News

पुण्यातील शुलभ नांगर नावाच्या तरुणाची सायबर चोरट्यांची फसवणूक केली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, सायबर चोरट्यांनी फिर्यादी शुलभ नांगर यांना मोबाईलवर संपर्क साधला. त्यांनी यूट्युबला सबस्क्राइब आणि लाइक करण्यासाठी आकर्षक कमिशन मिळेल, असे सांगितले. त्यानुसार आरोपींनी नांगर याला सुरवातीला १३५० रुपये कमिशनही दिले.

तसेच त्यानंतर टेलिग्राम ॲपवर लिंक पाठवून कमिशनचे आमिष दाखवून व्यवसायात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने वेळोवेळी ४९ लाख ६८ हजार रुपये घेतले. त्यानंतर आपल्याला कुठलेच कमिशन मिळाले नाही आणि आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्याने पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन या घटनेचा अधिक तपास सुरु केला आहे. Pune Crime News
