बाळासाहेब थोरात घेणार राजकीय संन्यास? नगरच्या राजकारणाला वेगळे वळण…!

अहमदनगर : काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सध्या चव्हाट्यावर आला आहे. यामुळे अनेकजण नाराज आहेत. जेष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्य काँग्रेस कमिटीमध्ये नाराजीनाट्य सुरू आहे.
यामुळे आता बाळासाहेब थोरात काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांची भूमिका सध्या महत्वाची आहे. सध्या ते राजकारणातून संन्यास घेतील अशी चर्चा सुरू आहे. तसेच भाजप प्रवेशाची शक्यता देखील नाकारता येत नाही.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीत डॉ. जयश्री थोरात भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवतील, अशीही चर्चा सुरू आहे. सत्यजित तांबे यांनीही अजून आपली भूमिका स्पष्ट केली नाही.
सध्या थोरात विरुद्ध पटोले हा वाद समोर आला होता. पटोलेंबरोबर काम करणं शक्य नाही असे थोरात यांनी पत्र लिहून हायकमांडला कळवले होते. असे असताना मात्र आता थोरात त्यांनी थेट विधिमंडळ पक्षपदाचा राजीनामा दिला आहे.