Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावरील १२ जणांच्या मृत्यूला आरटीओ जबाबदार, दोन अधिकाऱ्यांचे निलंबन..


Samruddhi Highway Accident  पुणे : समृद्धी महामार्गावर काल रात्री झालेल्या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला. नाशिकहून बुलढाण्याच्या सैलानी बाबाच्या दर्शनाला गेलेल्या पर्यटकांच्या ग्रुपवर काळानं घाला घातला.

संभाजीनगरच्या वैजापूर जवळील आगर सायगाव या ठिकाणी एक ट्रक थांबलेला असताना. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या भरधाव खाजगी बसणे या ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर बस दूरवर जाऊन पलटी झाली आणि या अपघातात बसमधील जवळपास १२ प्रवासी जागीच ठार झाले तर २०ते २२ प्रवासी जखमी आहेत. Samruddhi Highway Accident

समृद्धी महामार्गावर ट्रक आणि टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात झाला.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जांबरगाव टोलनाक्याजवळ झालेल्या या अपघातात १२ जणांचा मृत्यू झालाय.ज्यात लहान मुलं आणि तरुणांचा समावेश आहे.

समृद्धी महामार्गावर आरटीओने अवैधरीत्या थांबवलेल्या ट्रकला ट्रॅव्हलरच्या चालकाची झोपेत धडक दिल्याने अपघात झाला आहे. आरटीओने हायवेवर अपघातग्रस्त ट्रकला थांबवल्याचा व्हिडीओ समोर आली आहे. या व्हिडीओनंतर समृद्धी महामार्गावरील अपघात आरटीओ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे झाल्याचे स्पष्ट आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात होताच आरटीओ अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणहून पळ काढला आणि नंतर परत येऊन त्यांनीच अपघात झाल्याचा फोनही केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातासाठी आरटीओ अधिकारी जबाबदार असल्याचे सांगत दोन अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. या दोन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!