Uruli Kanchan News : पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी हद्दीत भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू..

Uruli Kanchan News : उरुळी कांचन : पुणे – सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत दुचाकी व छोटा हत्ती टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका ५५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
ज्ञानदेव मारुती ढगे (वय ५५, रा. सोरतापवाडी, ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हा अपघात शनिवारी (ता. १४) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास झाला. Uruli Kanchan News
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. १४) सकाळी ढगे हे त्याच्या घरी जाण्यासाठी पुणे -सोलापूर महामार्गाने घरी निघाले होते. यावेळी सोरतापवाडी चौकात थांबले असता त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. यावेळी पुण्याकडे जाणाऱ्या टेम्पोने ढगे यांना धडक दिली.
तसेच ढगे यांना तात्काळ लोणी काळभोर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सदर घटनेचा लोणी काळभोर पोलिसांनी पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. या घटनेचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.