Sharad Pawar : कमळ ऐवजी ‘हे’ चिन्ह वापरा, शरद पवार यांचा भाजपला टोला, म्हणाले ते चिन्ह चांगले राहील…


Sharad Pawar  नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये केलेल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि त्यानंतर भाजपने राष्ट्रवादीच्या नेत्यांना महाराष्ट्रातील सत्तेत सामील करून घेतले. राष्ट्रवादी जर भ्रष्ट पार्टी असेल, तर चौकशी करून कारवाई करा, असे आव्हान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिले. Sharad Pawar

जिथे आपली सत्ता येत नाही, तिथे समोरचे पक्षच फोडायचे, आधी ईडी,सीबीआय़ची भिती दाखवायची आणि भाजपमध्ये घ्यायचे, ते भाजपमध्ये आले की, कारवाई थांबवायची, त्यामुळे भाजपने आता कमळ चिन्हाऐवजी वॉशिंग मशीन हे चिन्ह घ्यावे असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला मारला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विस्तारीत कार्यसमितीची बैठक काल दिल्लीमध्ये झाली. यावेळी मार्गदर्शन करताना पवार यांनी पुढील रणनिती स्पष्ट केली. या बैठकीस २४ राज्यांतील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित होते.

शरद पवार Sharad Pawar  यावेळी म्हणाले, काही वर्षांपूर्वी ईडीचे नावही कुणाला माहिती नव्हते, मात्र आता गल्लीबोळातही ईडीची माहिती झाली आहे. केवळ राजकीय सूडापोटी या ईडीचा वापर होतो, कोणतेही ठोस कारण नसताना राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांना तुरुंगवारी करायला लावली. आता आपच्या नेत्यांना तुरुंगात टाकले जात आहे.

पक्षाचे नाव आणि चिन्ह त्यांना मिळेल असा त्यांचा दावा आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय काही आला तरी चिंता करण्याचे कारण नाही. राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे, आज ७० लोकांनी अध्यक्ष पदासाठी माझ्या नावाचा प्रस्ताव दिला आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजितदादा गटाला ठणकावले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!