Beed News : बीड हादरलं! चिमुकल्याचा केला व्यवहार, साडेतीन लाख रुपयांना केली विक्री, पाच जणांना पोलसांनी ठोकल्या बेड्या

Beed News बीड : बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने सोडून दिलेल्या २० वर्षीय महिलेला दुस-या लग्नाचे आमिष दाखवून तिच्या एका वर्षाच्या मुलाला गोवा राज्यात साडेतीन लाख रुपयांना विक्री करण्यात आल्याची घटना उघडकीस आली Beed News

या घटनेचे माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने कारवाई करत पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. तर, विक्री केलेले बाळ सुखरूप असून, त्याला त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, २० वर्षीय महिलेचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. यातून, तिने एका मुलाला जन्म दिला. दरम्यान, या सर्व प्रकरणाची माहिती समजताच पतीने तिला सोडून दिले. त्यामुळे ती महिला मागील काही दिवसांपासून आईकडे म्हणजेच माजलगावला राहत होती.

या काळात माजलगावातील ओळखीची असणा-या छायाच्या घरी महिलेचे येणे-जाणे सुरू झाले. विशेष म्हणजे याचवेळी किशोर भोजने नावाच्या व्यक्तीची पत्नीही नांदत नसल्याने तो देखील अधूनमधून छायाकडे येत होता. यावेळी त्याची या महिले सोबत ओळख झाली आणि त्याने तिच्या १ वर्षाच्या मुलाला आपले नाव दिले.

यावेळी छायाने या महिलेला दुसरे लग्न लावून देण्याचे आमिष दाखविले होते, तर तिचे मूल कोल्हापुरातील ललिता नावाच्या महिलेच्या मदतीने विक्री करण्याचा प्लॅन आखला. विशेष म्हणजे ललिता मुलं विकण्याचा व्यवसाय करत होती.
त्यानुसार तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने ग्राहक शोधला आणि साडेतीन लाखांत मुलाला विकले. मात्र, याची माहिती मिळताच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने कारवाई करत बाळाची सुटका केली आहे. तसेच पाच आरोपींना बेड्या देखील ठोकल्या आहेत.