Satara News : साताऱ्यातील दुष्काळ कायमचा हटणार, देवेंद्र फडणवीसांनी केली ‘या’ योजनेची घोषणा, शेतकऱ्यांना दिलासा

Satara News : सातारा : सातार्यातील दुष्काळप्रवण भागातील शेतकऱ्यांची चिंता मिटवणारी बातमी समोर आली आहे. कारण सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजल नियोजनास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन याची माहिती दिली आहे. Satara News
तसेच सातार्यातील दुष्काळप्रवण तसेच जे भाग पाण्यापासून संपूर्णपणे वंचित आहेत अशा भागांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले आहेत. Satara News
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis म्हणाले कि, मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजल नियोजनास मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्त्वातील आमच्या सरकारने मान्यता दिली असून, त्यासंबंधीचा आदेशही जारी करण्यात आला आहे.
सातार्यातील Satara News दुष्काळप्रवण तसेच जे भाग पाण्यापासून संपूर्णपणे वंचित होते, त्या परिसराला यामुळे कृष्णा प्रकल्पाचे पाणी उलपब्ध होणार आहे. २ टीएमसी अतिरिक्त पाणी उपलब्ध होणार असून मुख्यत्त्वे ४ तालुक्यातील ९००० हेक्टरला यामुळे सिंचन मिळणार आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, यात सातारा, कोरेगाव, माण आणि खटाव तालुक्यांचा समावेश आहे. स्व. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना सुद्धा यामुळे लाभान्वित होणार आहे.सातारा जिल्ह्यातील विशेषत: या तालुक्यांमधील शेतकर्यांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो!, असेही फडणवीस म्हणाले आहे.