Anushka Sharma : विराट कोहली-अनुष्का शर्माकडे पुन्हा एकदा गुड न्यूज! दुसऱ्यांदा होणार आई-बाबा? खास माहिती आली समोर…
Anushka Sharma मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज विराट कोहली Virat Kohli आणि त्याची पत्नी तसेच अभिनेत्री अनुष्का शर्माच्या Anushka Sharma चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. प्रेक्षकांची ही आवडती जोडी दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याचे समोर आले आहे.
विरुष्काच्या पहिल्या मुलीचे नाव वामिका असून अद्याप त्यांनी वामिकाचा चेहरा सर्वांपासून लपवून ठेवला आहे. या दरम्यानच विरुष्का पुन्हा एकदा पालक होणार असल्याचे समोर आले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार अनुष्का तिच्या दुसऱ्या ट्रायमिस्टरमध्ये आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार सूत्रांनी अशी माहिती दिली की, अनुष्काला लवकरच दुसरे बाळ होणार आहे. याआधीहीप्रमाणे आताही ती ही बातमी थोड्या उशिराने शेअर करणार आहे.
दरम्यान विरुष्काची पहिली मुलगी वामिकाचा जन्म जानेवारी २०२१ मध्ये झाला होता. अभिनेत्री प्रेग्नंट असल्याची चर्चा रंगली कारण गेल्या काही दिवसांपासून अनुष्का सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झालेली नाही.
मुंबईमध्ये असूनही ती पॅपाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली नाही, शिवाय ती कोणत्याही कार्यक्रमात दिसलेली नाही. यामुळे प्रेक्षकांची ही आवडती जोडी दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.