Pune News : पुणेकरांनो सिंहगडाची सफर आता होणार थाटात, पुणे महानगरपालिकेने घेतला मोठा निर्णय…
Pune News पुणे : पुण्यातील शिवनेरीपासून सिंहगड किल्ल्यापर्यंत सर्वच ठिकाणी नेहमी पर्यटकांची वर्दळ असते. पुणे शहरापासून सर्वात जवळ सिंहगड किल्ला आहे. या ठिकाणी जाण्यासाठी पुणे मनपाने एक पाऊल उचलले आहे. (Pune News)
पुणे महापालिकेचा शनिवार वाडा ते विश्रामबागवाडा असा हेरिटेज वॉक सुरु केला होता. त्याला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर आता सिंहगड किल्ला आणि आंबेगावमधील शिवसृष्टीसाठी सिग्नेचर वॉक सुरु करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. त्यासाठी वातानूकुलित बसेस सोडण्यात येणार आहे.
तसेच पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावरुन या वातानूकुलित मिनी बस सोडल्या जाणार आहे. पुणे शहराचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. या ऐतिहासिक महत्वाची ओळख विद्यार्थी आणि पर्यटकांना योग्य पद्धतीने व्हावी यासाठी पुणे महापालिकेने नुकताच हेरिटेज वॉक सुरू केले होते.
दर शनिवार शनिवाडा ते विश्रामबागवाडा दरम्यान असणारी ऐतिहासिक ठिकाणे दाखवली जातात. आता सिंहगड किल्ला आणि आंबेगाव येथील शिवसृष्टीसाठी सिग्नेचर वॉक सुरु केला जात आहे. यावेळी पर्यटकांना गाईडसुद्धा देण्यात येणार आहे. यामुळे ऐतिहासिक किल्ल्याची सर्व माहिती पर्यटकांना मिळणार आहे.
दरम्यान, वन विभागाने सिंहगडावर जाण्यासाठी ऑनलाईन बुकींग सुरु केले आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे शनिवार, रविवारी तिकीट काढण्यासाठी होणारी गर्दी होत नाही. पुणे वनविभागाने ऑनलाइन शुल्क भरुन तिकीट दिले आहे.
यामुळे सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांची सुविधा होत आहे.महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच एमटीडीसीचे रिसोर्ट सिंहगडावर आहे. या ठिकाणी पर्यटकांसाठी राहण्याची आणि जेवणाची सुविधा आहे. त्याचाही फायदा पर्यटकांना घेतो येतो. यामुळे भटकंती आता अधिक आरामदायी झाली आहे.