Icc World Cup 2023 : टीम इंडियाच्या संघात अचानक मोठा बदल! स्टार खेळाडू अचानक बाहेर, ‘या’ खेळाडूला मिळणार संधी…


Icc World Cup 2023 मुंबई : सर्वांचे लक्ष लागलेला आयसीसी वनडे वर्ल्ड कपला स्पर्धेला सुरुवात होणार आहे. परंतु त्यापूर्वी टीम इंडियामध्ये मोठा बदल झाला आहे. स्टार खेळाडू अचानक संघाबाहेर झाला आहे. यामुळे टीमला मोठा धक्का बसला आहे. (Icc World Cup 2023)

त्याच्या जागी दुसरा खेळाडू खेळवला जाणार आहे. वेगवान गोलंदाज शिवम मावी बॅक इंजरीमुळे एशियन गेम्समधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी आकाश दीपला संधी दिली आहे. यामुळे त्याच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.

एशियन गेम्समध्ये मेन्स क्रिकेट स्पर्धेचं 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान आयोजन केले आहे. ऋतुराज गायकवाड संघाचे नेतृत्व करणार आहे. संघात झालेल्या अचानक बदलामुळे क्रिकेटप्रेमीचे याकडे लक्ष लागले आहे.

याबाबत बीसीसीआयने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. लवकरच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा केली जाणार आहे. त्याअगोदर संघात मोठा बदल करण्यात आला आहे.

दरम्यान, आशिया सामन्याची अंतिम लढत श्रीलंका आणि टीम इंडियामध्ये होणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असल्याने सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे. भारत पाकिस्तान सामन्याच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!