Accident News : पुणे- बंगळुरू महामार्गावर मोठा अपघात, तीन ठार, वाहनांचा झाला भुगा…
Accident News पुणे : पुणे-बंगळुरु महामार्गावर रात्रीच्या सुमारास खंडाळानजीक झालेल्या मालवाहतुकीच्या वाहनांच्या अपघातात तिघे जण ठार झाल्याची माहिती समाेर आली आहे. खंडाळा येथील धनगरवाडी हद्दीत हा अपघात झाला. पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या मार्गांवर हा अपघात झाला. (Accident News)
पंक्चर झालेल्या ट्रकला मागून येऊन दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
या अपघातानंतर पुण्याला जाणारी वाहतूक काही काळ थांबली हाेती. सुमारे तासभरांनंतर पाेलिसांनी वाहतुक सुरळीत केली. या घटनेची पाेलिस सखाेल चाैकशी करीत आहेत.
Views:
[jp_post_view]