MLA Disqualified : राज्याच्या राजकारणात पुन्हा नवीन घडामोडी घडणार, शिवसेना आमदार अपात्र प्रकरणासंदर्भात समोर आली मोठी अपडेट…
MLA Disqualified मुंबई : शिवसेना आमदार अपात्राता(MLA Disqualified) प्रकरणाची मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे. या सुनावणीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस बजावण्यास सुरूवात झाली आहे. या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
तसेच शिवसेनेच्या ४० तर ठाकरे गटाच्या १४ आमदारांना शिवसेना आमदार अपात्राता (MLA Disqualified) प्रकरणासंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती विधिमंडळाच्या सूत्रांनी दिली आहे. पुढील आठवड्यात होणारी ही सुनावणी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात होणार असल्याची माहिती आहे.
सुनवाणीवेळी शिवसेनेच्या ४० तर ठाकरे गटाच्या १४ आमदारांना विधिमंडळ अध्यक्षांकडून त्यांचे मत मांडण्याचा अधिकार देण्यात येणार आहे. यावेळी हे सर्व आमदार त्यांना काही पुरावे सादर करायचे असतील तर त्यांना ते सादर करता येणार आहे, असेही सांगितले जात आहे.
दरम्यान, यावेळी या आमदारांना त्यांचे काही पुरावे सादर करायचे असतील तर त्यांना ते पुरावे सादर करता येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे आता याबाबत काही निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.