अजितदादांच ठरलं? बारामतीमधून न लढता निवडला नवीन मतदारसंघ, राजकीय घडामोडींना वेग..
पुणे : राजकीय घडामोडींना वेग आला असून आगामी विधानसभा निवडणुकीत विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार खडकवासला मतदार संघातून भाजपच्या पाठिंब्यावर लढणार असल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
तसेच अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या राजकीय भवितव्यासाठी बारामती विधानसभा मतदार संघ मोकळा केला जाणार असल्याची चर्चा आहे. यामुळे आता अजित पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पार्थ पवार यांनी आधी लोकसभा निवडणूक लढवली होती. पण त्यांना यश आले नव्हते. यामुळे ते पुन्हा एकदा निवडणुकीत उभे राहण्याची शक्यता आहे. पार्थला बारामती देऊन अजित पवार खडकवासला मतदारसंघातून लढू शकतात.
या मतदारसंघातून आजपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रमेश वांजळे आणि भारतीय जनता पक्षाचे भिमराव तापकीर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करून निवडून आले आहेत. यामुळे आता काय होणार हे लवकरच समजेल.
दरम्यान, अजित पवार निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला या मतदारसंघात प्रथमच विजय मिळणार आहे. असे असले तरी याठिकाणी अनेकजण इच्छुक आहेत. मात्र अजित पवार उभा राहील तर जास्त काही अडचण येणार नाही.
याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर, सचिन दोडके आदींनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली होती. यामुळे त्यांना माघार घ्यावी लागणार की अजित पवार वेगळा निर्णय घेणार हे लवकरच समजेल.