मोठी बातमी! शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांची तोडफोड, राज्यात मराठा समाज आक्रमक…

जालना : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे गेले होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यातील गाड्यांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अज्ञात लोकांकडून डीवायएसपी सिध्देश्वर भोरे यांच्या सरकारी वाहनावर दगडफेक करण्यात आली आहे.
वाढता जमाव पाहता पोलिसांनी तेथून वेळीच काढता पाय घेतला. त्यामुळे खूप मोठा अनर्थ टळला आहे. जालन्यातील मराठा समाजाचे आंदोलन अमानुष पद्धतीने मोडून काढले.
यावेळी अनेकांवर लाठीचार्ज करण्यात आला. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने राज्यातील वातावरण चांगलेच ढवळून निघालं आहे.
आंदोलनकर्त्यांकडून सरकार आणि पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी लाठीचार्ज करून खूप मोठी चूक केली आहे, त्याचे त्यांना वाईट परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला आहे.
या घटनेच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्रात बंदची हाक पुकारण्यात आली आहे. यामुळे आता सरकारवर टीका केली जात आहे. अनेक ठिकाणी गाड्या जाळण्याचा प्रकार देखील झाला.
एका सरपंचाने स्वतःची गाडी जळल्याची घटना घडली. यामुळे राज्यात मराठा समाज आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर यामुळे जोरदार टीका होत आहे.