Pune Crime : फ्लिपकार्टचे कर्मचारीच ग्राहकांना घालत होते गंडा; ऑनलाईन ऑर्डरमध्ये बंद मोबाईल अन् साबण…चौघांना बेड्या, गुन्हे शाखेची कारवाई..


Pune Crime पुणे : ऑनलाईन मागवलेल्या वस्तूंबाबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आता ऑनलाइन मागवलेल्या मोबाईलच्या पॅकिंग बॉक्समध्ये बंद पडलेला मोबाईल किंवा साबण ठेवून ग्राहकांची फसवणूक होत असल्याची घटना पुण्यातून समोर आली आहे.

यामुळे याबाबत पोलीस तपास केल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये फ्लिपकार्टचे कर्मचारीच ग्राहकांना गंडा घातल होते. या प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा तपास सुरू आहे.

त्यांच्याकडून ४.५ लाख रुपये किमतीचे १९ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पुण्यामधील एका मोबाईल दुकान मालकाने ७.५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली होती.

पोलिसांनी या घटनेचा तपास करत असताना अनेक ग्राहक बड्या कुरियर कंपन्यांमार्फत मोबाईल खरेदी करतात. तसेच त्या कुरियर कंपन्या मोबाईल दुकानात ऑर्डर नोंदवून ग्राहकांना मोबाईल घरपोच देत असल्याचे समोर आले.

याच माहितीच्या आधारे पोलिसांनी एक कुरियर कंपनी गाठली. त्या कुरियर कंपनीचे चार कर्मचारी तो बॉक्स मोबाईल दुकानदाराला देताना त्यात जुना बंद पडलेला मोबाईल, फरशीचा तुकडा किंवा साबण ठेवून देत होते. चौकशी केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

पोलिसांनी या प्रकरणात अधिक तपास करत या कंपनीतील चार कर्मचाऱ्यांना अटक केली. या कारवाईमध्ये आरोपींच्या ताब्यातून ४.५ लाख रुपये किमतीचे विविध कंपनीचे १९ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

चक्क फ्लिपकार्टचे कर्मचारीच ग्राहकांची फसवणूक करत असल्याचा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अनेकदा आपल्याकडे अशा प्रकारे दुसरी वस्तू आल्याच्या बातम्या आल्या होत्या.

त्यामध्ये नजरचुकीने देखील अनेक घटना घडल्या आहेत. आता मात्र कर्मचाऱ्यांनीच असा प्रताप केल्याने अशा वस्तू खरेदी करायच्या की नाहीत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!