कल्याणीनगरमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; एकाला अटक, परदेशी तरूणीसह दोघींची सुटका..


पुणे : कल्याणीनगर येथील तारांकित हॉटेलमध्ये परदेशी तरुणींकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

करण ऊर्फ रामू किशोर यादव (वय ३५, रा. स्काय लाईट सोसायटी, वाघोली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागातील महिला अंमलदारांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हा प्रकार कल्याणीनगर येथील रॉयल ऑर्चिड गोल्डन सुट या हॉटेलमध्ये सुरु असल्याची माहिती पोलिस अंमलदार सागर केकाण आणि तुषार भिवरकर यांना मिळाली होती.

त्यानुसार, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. ग्राहकाने इशारा केल्यानंतर पोलिसांनी रॉयल ऑर्चिड गोल्डन सुट या हॉटेलवर छापा टाकून एका उझबेकिस्तानी तरुणीला पकडले. तेथेच करण यादव याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे चौकशी केल्यावर रॉयल ऑर्चिड सेंटल या हॉटेलमध्येही एका उत्तर प्रदेशातील तरुणीकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे समजले. तेथून एका तरुणीला ताब्यात घेतले. वेश्या व्यवसायातून मिळालेले २५ हजार रुपये पोलिसांनी जप्त केले असून दोघा तरुणींना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे, एपीआय राजेश माळेगावे, एपीआय अश्विनी पाटील, पोलिस हवालदार अजय राणे, राजेंद्र कुमावत,बाबा कर्पे, पोलिस अंमलदार सागर केकाण, तुषार भिवरकर, अमेय रसाळ, अमित जमदाडे, संदीप कोळगे, किशार भुजबळ, ओंकार कुंभार, इरफान पठाण आणि महिला पोलिस रेश्मा कंक यांच्या पथकाने केली आहे. पोलीस निरीक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!