दौंड नगरपरिषदेचे चित्र स्पष्ट! २६ जागेसाठी ८६ उमेदवार रिंगणात, नगराध्यक्ष पदासाठी ६ जण लढणार…


दौंड : राज्याच्या राजकरणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच बिगुल वाजल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात महापालिका निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची राजकीय समीकरण जुळवण्याची तयारी सुरू झाली आहे. स्थानिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडण्याची चिन्हे दिसत आहेत.

तसेच दौंड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी १२१ पैकी ३५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ८६ उमेदवार रिंगणात राहिले, तर नगराध्यक्ष पदासाठी १३ उमेदवारांपैकी ७ जणांनी उमेदवारी मागे घेतल्याने ६ जण रिंगणात आहेत.

दौंड नगर परिषदेच्या निवडणुकीत २६ जागेसाठी १५० उमेदवारांनी १२१ उमेदवारी अर्ज भरले होते. तर एका नगराध्यक्ष पदासाठी १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. शुक्रवारी (दि.२१) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. दुपारी तीन वाजेपर्यंत १२१ यापैकी ३५ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

त्यामुळे २६ जागेसाठी ८६ जण रिंगणात राहिल्याचे चित्र स्पष्ट झाले. नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी १३ पैकी सात जणांनी आपले नगराध्यक्ष पदासाठी भरलेले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी आता ६ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

दरम्यान, नगरपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीतील भाजपचे आमदार राहुल कुल आणि प्रेमसुख कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिक हित संरक्षण मंडळ आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभे केल्याने या दोन्हींमध्ये चांगलीच चुरशीची लढत होणार असल्याचे चित्र आहे.

तर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २६ जागेवर पूर्णपणे उमेदवार उभे करता आले नाही. त्यांना अपक्ष उमेदवारांची मदत घ्यावी लागणार असल्याचे चित्र आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!