कारमध्ये बसून एकाच कुटुंबातील 7 जणांची आत्महत्या, धक्कादायक घटनेने सगळेच हादरले…


कारमध्ये बसून विष प्राशन करुन कुटूंबातील सर्वांनी आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना हरियाणामध्ये घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आजोबा, आई-वडिल आणि मुलांचा मृत्यू झाला आहे. सर्व सातही जणांनी आत्महत्या केल्याने याची चर्चा सुरू झाली आहे.

पंचकूलामध्ये हे कुटुंब रहायचं. मृतांमध्ये एक जोडपं, त्यांची तीन मुलं आणि कुटुंबातील वृद्धांचा समावेश आहे. ज्या कारमध्ये हे सर्व मृतदेह मिळाले, त्या कारचा नंबर डेहराडूनचा आहे. पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला आहे.

रात्री पोलिसांना एक फोन आला. त्यांना सांगण्यात आले की, एक कार पंचकूलाच्या सेक्टर-27 मध्ये उभी आहे. त्यात काही लोकांनी आत्महत्या केली आहे. कारमध्ये 7 जण होते. डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केल. रुग्णालयात आणण्याआधीच सर्वांनी प्राण सोडले होते. याबाबत काय कारण होते का? याचा तपास पोलीस करत आहेत.

मृतकांची ओळख पटली आहे. देशराज मित्तल आणि प्रवीण मित्तल अशी त्यांची नाव आहेत. याबाबत प्राथमिक माहिती अशी की, प्रवीणने डेहराडून येथे टूर अँड ट्रॅव्हलचा बिझनेस सुरु केला होता. त्याने बिझनेसमध्ये बराच पैसा टाकला होता. पण यश मिळालं नाही.

बिझनेस लॉसमध्ये गेल्याने प्रवीण कर्जात बुडाला होता. कुटुंबाचा खर्च भागवणही दिवसेंदिवस त्याच्यासाठी कठीण झाले होते. म्हणून संपूर्ण कुटुंबाने जीवन संपवले, असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

दरम्यान, पोलिसांनी मृतदेह कारमधून काढून पंचकूलाच्या येथील एका खासगी रुग्णालयातील शवागरात ठेवण्यात आले आहेत. सर्व मृतदेहांच पोस्टमार्टम होईल. कारमध्ये 7 जण होते. याबाबत पोलीस तपास करत आहेत. घटनेने मात्र अनेकांची चौकशी होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!