वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांचा अपघात ७ ठार तर २५ जखमी ! दिल्ली – जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील अपघात ..!!
हरियाणा: सध्या अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हरियाणातून ही बातमी समोर आली आहे. हरियाणातील अंबाला येथे गुरुवारी रात्री उशिरा ट्रक आणि मिनी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील सुमारे सात जणांचा मृत्यू झाला. याशिवाय या अपघातात सुमारे 25 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे.
गुरुवारी, 23 मे रोजी रात्री उशिरा अंबाला येथे ट्रक आणि मिनी बसची धडक झाली. या घटनेत सुमारे सात जणांचा मृत्यू झाला, तर 25 जण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, भाविक बसने वैष्णोदेवीला जात होते. यादरम्यान अपघात झाला. यामुळे सगळीकडे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृत हे एकाच कुटुंबातील होते. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.