देशात कोरोना वाढतोय! २४ तासात ६ जणांचा मृत्यू, वाचा आकडेवारी…
नवी दिल्ली : देशात नवीन वर्षाच्या सुरुवाती आधी पुन्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या २४ तासात कोरोणामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
तसेच कोरोनाच्या ७०२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशभरातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ४,०९७ वर पोहोचली आहे.
२२ डिसेंबर रोजी देशात ७५२ नवे रुग्ण आढळले आहेत. थंडीत आधीच लोकांची प्रतिकारशक्ती कमकुवत झालेली असते. त्यात कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्याला तोंड द्यावे लागते.
अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात सहा मृत्यू झाले आहेत, त्यात महाराष्ट्रातील दोन आणि दिल्ली, कर्नाटक, केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. यासह, जानेवारी २०२० पासून भारतात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४,५०,१०,९४४ वर पोहोचली आहे.
याशिवाय, आतापर्यंत देशात ५,३३,३४६ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच दिल्लीमध्ये बुधवारी कोविड-१९ चा उपप्रकार एएन.१ चे पहिले प्रकरण नोंदवले गेले. यामुळे पुन्हा एकदा देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले. तसेच प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.