धक्कादायक! ५८ वर्षाच्या PSI चा पुण्यातील २३ वर्षाच्या तरुणीवर अत्याचार, लॉजवर घेऊन जायचा अन्, अनेकदा गर्भपात


पुणे : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. पोलिसांना समाजाचा रक्षक म्हटलं जातं पण रक्षकच भक्षक झाला तर समाज विघटनाच्या वाटेवर जातो. याची प्रचिती देणारी एक घटना समोर आली आहे.

छत्रपती संभाजीनगरमधून खाकी वर्दीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईल हरवल्याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या २३ वर्षीय तरुणीवर चक्क एका ५८ वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाने अत्याचार केल्याचा खळबळजनक आरोप झाला आहे.

मदतीचा बहाणा करून आणि लग्नाचे खोटे आमिष दाखवून पीडितेचे शारीरिक शोषण केल्याचे समोर आले असून, या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात संबंधित अधिकारी, त्याची पत्नी आणि मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

या प्रकरणातील पीडित तरुणी मूळची नांदेडची असून ती पुण्यात खासगी नोकरी करते. ७ मार्च २०२५ रोजी ती मोबाईल हरवल्याची तक्रार देण्यासाठी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गेली होती. तिथे तिची ओळख पीएसआय सुभाष चव्हाण याच्याशी झाली.

आरोपीने पीडितेचा विश्वास संपादन करण्यासाठी नंबर कन्फर्म करायचा आहे, अशी थाप मारून तिचा फोन नंबर मिळवला आणि त्यानंतर सतत संपर्कात राहून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून विविध लॉजवर नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

इतकंच नाही तर, बनावट मंगळसूत्र बांधून ती आपली पत्नी असल्याचे नाटकही त्याने केलं. या काळात पीडित तरुणी तीन वेळा गर्भवती राहिली होती, मात्र तिची इच्छा नसतानाही पुणे आणि संभाजीनगर येथे तिचा जबरदस्तीने तीनवेळा गर्भपात घडवून आणल्याचा खळबळजनक आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ही क्रूरता केवळ शारीरिक शोषणापुरती मर्यादित राहिली नाही.

जेव्हा पीडितेने लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा आरोपी चव्हाण याने तिला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणाची माहिती मिळताच आरोपीची पत्नी नर्मदा आणि मुलगा सागर यांनीही पीडितेला मारहाण करून धमकावले.

२८ जानेवारी रोजी आरोपीच्या पत्नीने आणि मुलाने केलेल्या मारहाणीमुळे पीडितेचा दीड महिन्याचा गर्भपात झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या कौटुंबिक छळामुळे पीडितेचे मानसिक आरोग्य पूर्णपणे कोलमडले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!