अखेर ठाकरेंना पुण्यात मोठा धक्का!! ५ नगरसेवकांचा पक्षाला जय महाराष्ट्र, भाजपात आजच प्रवेश करणार…


मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्याचे चित्र आहे. त्यानंतर आज भाजप धक्का देणार आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे पुण्यातील पाच नगरसेवक आणि शिवसैनिक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे ५ नगरसेवक आज भाजपात प्रवेश करणार आहेत.

हे नगरसेवक करणार प्रवेश..

विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल, संगीता ठोसर, पल्लवी जावळे आणि प्राची आल्हाट असे एकूण शिवसेनेचे 5 नगरसेवक आणि शिवसैनिक भाजपचे कमळ हाती घेणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेज, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील भाजप कार्यालयात हा प्रवेश होणार आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. मुंबई, ठाणे, पुण्यासह इतर महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे.

आगामी निवडणुका लक्षात घेता सगळ्याच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी काही राजकीय पक्षांमध्ये विशेषत: सत्ताधारी पक्षात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग होण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
WhatsApp Group