नागरिकांना चोरी करून लुटमार करणाऱ्या 4 आरोपींना अवघ्या ८ तासात बेड्या, लोणी काळभोर पोलिसांची कारवाई…

लोणी काळभोर : वॉकिंग करीत असलेल्या जेष्ठ नागरिकांस जबरी चोरी करून लुटमार करणा-या ४ तरुण आरोपींना अवघ्या ८ तासाचे आत लोणी काळभोर पोलीसांनी जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. त्यांचेकडून १ लाख ५७ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी महादेव रामभाऊ कापसे, (वय ६३, रा. कवडीगाव रोड, रेल्वे गेट शेजारी, कदमवाकस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली, जिल्हा-पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुजल बाळासाहेब झेंडे (वय २०, रा. गुरुदत्त कॉलनी भेकराईनगर, हडपसर पुणे), शुभम संजय चव्हाण (वय २४, रा. गोसावी वस्ती, हडपसर पुणे) ओमकार अशोक चितंलु, (वय २१, रा. आनंदनगर सोसायटी, हडपसर पुणे) व अभिजीत सतिष कांबळे (वय २०, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली, जिल्हा पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.
या संदर्भातील सविस्तर माहिती अशी की, महादेव कापसे हे सायंकाळी ७/३० वाजण्याच्या सुमारांस हे त्यांचे मित्रासोबत कदमवाकस्ती ग्रामपंचायत हद्दीतील रिव्हर व्ह्यु सिटीचे मागील रेल्वे लाईनच्या मोकळ्या जागेत वॉकिंग करीत होते. त्यावेळी तेथे ४ अनोळखी इसम आले व त्यांनी कापसे यांना शिवीगाळ व दुखापत करुन जबरदस्तीने त्यांचा मोबाईल फोन चोरुन नेला. याप्रकरणी त्यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यांवरून तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.

दाखल गुन्हयाचे तपासादरम्यान तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव यांना गोपनिय बातमीदारामार्फत खात्रीशिर बातमी प्राप्त झाल्याने अवघ्या ८ तासांत झेंडे, चव्हाण, चितंलु व कांबळे यांना शिताफीने ताब्यात घेऊन त्यांचेकडे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांचेकडुन लोणी काळभोर पोलीसांनी १ लाख ५७ हजार रुपयांचा १ मोबाईल फोन व २ मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उपआयुक्त, परिमंडळ ६, डॉ. राजकुमार शिंदे व सहाय्यक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अनुराधा उदमले यांचे मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्मिता पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस हवालदार सागर जगदाळे, रामहरी वणवे, संभाजी देवीकर, अण्णा माने, पोलीस शिपाई बाजीराव वीर, प्रविण दडस, सुरज कुंभार, प्रशांत सुतार, सचिन सोनवणे, राहुल कर्डीले, अशोक गिरी यांनी केली आहे.