शिरूर–हवेली मतदारसंघात ग्रामीण- शहरी रस्त्यांना ३४ कोटींचा निधी; हडपसर ते यवत तर लोणीकाळभोर मेट्रो प्रकल्पासाठी निधीच्या तरतुदीला यश; आमदार ज्ञानेश्वर कटकेंची महत्वाची माहिती..


उरुळीकांचन : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिरूर व हवेली विधानसभा मतदारसंघासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे विविध ग्रामीण रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल ३४ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शिरूर व हवेली तालुक्यातील अनेक प्रमुख मार्गांचे मजबुतीकरण, रुंदीकरण, डांबरीकरण तसेच काँक्रीटीकरण करण्यात येणार असून ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.

शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात वाहतूक सुविधा सुधारण्यासाठी शासनाने अनेक महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली आहे. शिरूर–निमोणे–गुणाट–कुरुळी–वडगाव रासाई–मांडवगण फराटा (रा.म. ९) या प्रजिमा ५३ मार्गाच्या सुधारणा कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच मलठण–ढोकसांगवी–कोरेगावकडे जाणाऱ्या निमोणे मार्गाच्या (प्रजिमा ११४) किमी दरम्यानच्या रस्त्याचे मजबुतीकरण, रुंदीकरण व सुधारणा करण्यात येणार आहेत.

याशिवाय मिरवडी–दहिटणे–राहू–वाळकी संगम ते रांजणगाव सांडस–नागरगाव–कुरळी (प्रजिमा ११३) या मार्गावरील रस्त्याचे किमी दरम्यान रुंदीकरण, मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे. तसेच आरणगाव–आलेगाव मार्गावरील वडगाव रासाई–सादलगाव–मांडवगण फराटा–गणेगाव तांदळी (प्रजिमा ४०) या रस्त्याच्या कामांसाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे.

त्याचबरोबर न्हावरे–चिंचणी (प्रजिमा ५९) या मार्गावरील रस्त्याच्या किमी दरम्यान मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. तसेच शिरूर–निमोणे–निर्वी–कुरुळी–वडगाव रासाई–मांडवगण फराटा (प्रजिमा ५३) या परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण व सुधारणा करण्यात येणार आहेत.

दरम्यान, हवेली तालुक्यातीलही काही महत्त्वाच्या रस्त्यांना या निधीतून चालना मिळणार आहे. वाघोली–भावडी–तुळापूर (प्रजिमा १६६) या मार्गाचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. तसेच कोरेगाव–भिवरी–वाडेबोल्हाई–डोंगरगाव–पेरणे फाटा–वढू बुद्रुक ते वढू खुर्द (प्रजिमा १९ / प्रजिमा २२६) या मार्गावरील रस्त्याचे मजबुतीकरण, सुधारणा व रुंदीकरण करण्यासाठीही शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे.

या विविध रस्त्यांच्या कामांमुळे शिरूर व हवेली तालुक्यातील गावांमधील दळणवळण अधिक सुकर होणार असून शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ग्रामीण भागातील बाजारपेठा, शैक्षणिक संस्था आणि औद्योगिक क्षेत्राशी जोडणी अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत आमदार माऊली आबा कटके यांनी केलेल्या पाठपुराव्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. आगामी काळात या कामांना गती मिळाल्यास ग्रामीण विकासाला निश्चितच नवी दिशा मिळेल, असा विश्वासही नागरिकांनी व्यक्त केला आहे.

हडपसर -यवत मार्गासाठी ५२६८ कोटी रुपये मंजूर…

मतदारसंघातील हडपसर ते उरुळीकांचन दरम्यान वाहतुककोंडी सोडविण्यासाठी नव्याने विकसित होणाऱ्या हडपसर ते यवत उन्नत मार्गासाठी अर्थसंकल्पातून ५२६८ कोटी रुपये मंजूर झाले आहे. त्यामुळे भविष्यात या उन्नत मार्गाचे काम जलदगतीने सुरू होणार आहे. तसेच हडपसर ते लोणीकाळभोर मेट्रो मार्गिकेला अर्थसंकल्पात तरतूद होईन हा प्रकल्प सुरू होण्यास मदत मिळणार असल्याचे शिरुर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!