पुण्यातील 28 वर्षीय तरुण सेक्सटॉर्शनला बळी; तरुणीने व्हिडिओ कॉल आणि व्हॉट्सअॅपद्वारे अडीच लाख उकळले


पुणे : खराडी परिसरातील 28 वर्षीय तरुण ‘सेक्सटॉर्शन’ला बळी पडल्याची घटना उघडकीस आली आहे. या तरुणाशी सोनम गुप्ता नावाच्या तरुणीने व्हॉट्स अॅपद्वारे संभाषण आणि व्हिडिओ कॉलवरून अश्लील चाळे करून ‘स्क्रीनशॉट’ घेतले. त्यानंतर ते फोटो व व्हिडिओ मॉर्फ करून समाजमाध्यमात व्हायरल करण्याची धमकी दिली. तरुणाला ब्लॅकमेल करून तरुणीने त्याच्याकडून तब्बल अडीच लाख रुपये उकळले असल्याची माहिती समोर आली आहे. भीतीपोटी तक्रारदार तरुणाने आरोपीच्या सांगण्यानुसार वेळोवेळी पैसे पाठवले.

पुण्यातील खराडी भागातील थिटेनगर परिसरात राहणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणाने या संदर्भात तक्रार दिली आहे. तरुणाशी ऑनलाइन मैत्री करून त्याची नग्न छायाचित्रे व मॉर्फ व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करून या तरुणाकडून अडीच लाख रुपये उकळण्यात आल्याचा आरोप आहे. त्यावरून सायबर चोरट्या तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान वारंवार घडत असलेल्या सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या व्हिडिओ कॉलला उत्तर देऊ नका. फोन किंवा समाजमाध्यमातून धमकी मिळाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधा, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!