25 हजार कोटी रुपयांचा पुणे- छत्रपती संभाजीनगर महामार्ग रखडला, निधीची तरतूद नाहीच, कधी होणार कामाला सुरुवात?

पुणे : सरकारकडून दळणवळण व्यवस्था मजबूत व्हावी यासाठी पुणे ते छत्रपती संभाजी नगर या दोन्ही शहरादरम्यान पंचवीस हजार कोटी रुपयांचा नवा द्रुतगती महामार्ग बांधण्यात येणार आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या महामार्ग प्रकल्पाचा निर्णय घेण्यात आला होता. असे असताना हा महामार्ग अजून अनेक कारणांनी अडकला आहे.

यासाठी 2500 कोटी रुपयांच्या निधीची गरज भासणार आहे पण राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर आता जवळपास दहा महिने उलटले आहेत पण अजूनही या मार्गासाठी आवश्यक भूसंपादन हेतू निधीची तरतूद करून देण्यात आलेली नाही. यामुळे हा मार्ग राखडला आहे. महामार्गाचे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळकडून केले जाणार आहे.

या प्रकल्पासाठी ची भूसंपादनाची अधिसूचना म्हणजेच अधिसूचना 3 (ए) काढून आता 31 महिन्यांचा काळ पूर्ण झाला आहे पण अजूनही याच्या भूसंपादनासाठी निधीची तरतूद झालेली नाही. यासाठी तीन जिल्ह्यांमध्ये भूसंपादन करावे लागणार आहे. पुणे, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यांमधून हा महामार्ग विकसित करण्यात येणार आहे.

या प्रकल्पासाठी झाल्टा येथे या प्रकल्पासाठी माती परीक्षण करून महामंडळाकडून मुख्यालयाकडे आपला अहवाल सादर करण्यात आला. गेल्यावर्षी शासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यामध्ये महत्त्वाचा करार करण्यात आला. यामध्ये तीनही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आणि राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांच्या समन्वयाने प्रकल्पासाठीचे भूसंपादन पूर्ण होईल असे सांगण्यात आले.
दरम्यान, प्रकल्पासाठीची भूसंपादनाची अधिसूचना 3 (ए) काढून आता 31 महिन्यांचा काळ पूर्ण झाला आहे पण अजूनही याच्या भूसंपादनासाठी निधीची तरतूद झालेली नाही. यामुळे सगळी कामे रखडली आहेत. जिल्हा-जिल्ह्यांमधील अंतर कमी करण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
