पुण्यात 20 वर्षीय तरुणीची थेट आठव्या मजल्यावरून उडी ; आई अभ्यासावरून रागावल्याचा राग..


पुणे : पुण्यातील वाघोली परिसरातील एका वीस वर्षीय तरुणीने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून थेट उडी घेत आपल आयुष्य संपवले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आई अभ्यासावरून रागावल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचल असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सारा बलराम अंधारे (वय २०, रा. मॅजेस्टिक सोसायटी, भावडी रोड, वाघोली) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. आई आणि तिच्यात अभ्यास आणि बाहेर जाताना सांगण्यावरून वाद झाला. शनिवारी घरी कोणी नसताना पाहून साराने दुपारी पाऊणच्या सुमारास इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारली.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांच्या मदतीने तिला तात्काळ लाईफ लाईन हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला.वाघोली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेने परिसरात हळूहळू व्यक्त केली जात आहे.

या आत्महत्या मागील कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी आई रागावल्याच्या कारणामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!