पुण्यातील पोर्शे कार अपघातातील 2 पोलीस अधिकारी बडतर्फ होणार, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची मोठी कारवाई….


पुणे : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. या प्रकरणात दोषी आढळलेल्या पुणे पोलीस दलातील दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. आता हे दोन पोलीस अधिकारी पोलीस सेवेतूनच बडतर्फ होण्याची शक्यता आहे.

याचे कारण या दोन अधिकाऱ्यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविला आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत अमितेश कुमार म्हणाले, पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे तसेच सहाय्यक निरीक्षक विश्वनाथ तोडकरी अशी पोलिस अधिकाऱ्यांची नावे आहेत.

कामात कसूर केल्याचा ठपका ठेवून येरवडा पोलीस ठाण्याचे तत्कालीन गुन्हे निरीक्षक राहुल जगदाळे आणि रात्रपाळीवर कामाला असलेले सहाय्यक निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना तेव्हा निलंबित करण्यात आले होते. यामुळे हे प्रकरण गाजले होते.

तसेच त्यांची विभागीय चौकशी सुरू होती. विभागीय चौकशी पुर्ण झाल्यानंतर त्यात दोघे दोषी आढळले. यामुळे कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे आई-वडिल, ससूनचे २ डॉक्टर यांच्यासह १० जणांना अटक केली. तेव्हापासून सर्वजण अद्यापही कारागृहात आहेत.

दरम्यान, १९ मे २०२४ च्या मध्यरात्री पबमधून पार्टीकरून परत जात असताना अल्पवयीन कारचालकाने वेगात कार चालवत दुचाकीला पाठीमागून धडक दिली होती. या अपघातात दुचाकी वरील तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता. तेव्हापासून याबाबत कारवाई केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!