पुणेकरांसाठी मेट्रोची २ नवीन स्थानकं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली महत्वाची माहिती…

पुणे : पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-२ च्या विस्तारित मार्गावर स्वारगेट ते कात्रज या कॉरिडॉरवर दोन नवीन स्थानकं उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे पुणेकरांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे.

बालाजीनगर व बिबेवाडी इथं ही दोन मेट्रो स्थानकं उभारली जाणार असून त्यासाठी अतिरिक्त खर्चास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत माहिती दिली आहे. या निर्णयामुळे पुणे शहरातील दक्षिण भागातील नागरिकांसाठी मेट्रो प्रवास अधिक सुलभ होणार आहे.
तसेच वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत मिळणार आहे. त्याचप्रमाणे पुणे मेट्रो टप्पा-२ चा विस्तार अधिक कार्यक्षम होऊन पुणेकरांना आधुनिक, जलद आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीचा लाभ मोठ्या प्रमाणात मिळणार आहे. यामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळे अजित पवार यांनी अनेक निर्णय घेतले आहेत. याबाबत त्यांनी यंत्रणा सुरळीत करण्यासाठी हालचाल सुरू केली आहे.