स्वामी विवेकानंद अकॅडमी विद्यालयाच्या १८ विद्यार्थ्यांना ‘स्काऊट गाईड’ राज्य पुरस्कार..!

उरुळी कांचन : उरुळी कांचन ( ता.हवेली ) येथील स्वामी विवेकानंद अकॅडमी विद्यालयाच्या स्काऊट गाईड पथकातील १८ विद्यार्थ्यांना स्काऊट गाईड राज्य पुरस्कार मिळाला आहे.

भारत स्काऊट गाईड राज्य कार्यालयाच्या वतीने दरवर्षी पुरस्कार चाचणी शिबिराचे आयोजन केले जाते. या वर्षी १२ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत झालेल्या राज्य पुरस्कार चाचणी शिबिरात स्काऊट विभागातून विद्यालयाचे ६ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. यामध्ये आशिष भीमसेन रणदिवे,यशराज बाबुराव थोरात, विश्व राहुल जवळकर,यश धनंजय कापणे, सिद्धांत मल्लिनाथ शिंगे, उत्कर्ष प्रशांत किर्वे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
तर गाईड विभागाची राज्य पुरस्कार परीक्षा १६ ते १९ जानेवारी संपन्न झाली होती. यात विद्यालयात १२ विद्यार्थीनीं यशस्वी झाल्या आहेत. यामध्ये स्वराली विशाल फडतरे, संस्कृती विशाल म्हेत्रे, स्वरा सुभाष वलटे,अंतरा प्रशांत बगाडे,अक्षरा सोमनाथ कदम सिद्धी फुलचंद ढवळे,सिद्धी अशोक ठुले, सिद्धी विनोद शिवरकर, कार्तिकी रामराज काकडे, समृद्धी सचिन त्र्यंबके, कार्तिकी भागोजी कामठे,स्वरांजली रवींद्र गुंजाळ या विद्यार्थ्यांनींचा समावेश आहे.

विद्यालयातून या परीक्षेसाठी विद्यालयाचे स्काऊट शिक्षक नागेश काळभोर व गाईड शिक्षिका दिपाली शिर्के यांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले असून या विद्यार्थ्यांना राष्ट्रपती पुरस्कार तयारीसाठी विद्यार्थ्यांची तयारी हे शिक्षक करीत आहे.
