संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 126 दिवस उलटले पण कृष्णा आंधळे सापडेना, अखेर SIT ने घेतला मोठा निर्णय..


बीड : जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. या प्रकरणाला 126 दिवस उलटले पण अजून त्याचा तपास लागला नाही. आरोपी कृष्णा आंधळे याला पकडण्यासाठी पोलिसांनी अथक प्रयत्न केले असले तरी अजूनही त्याला शोध लागला नाही. अशातच आता एसआयटीने मोठा निर्णय घेतला आहे.

आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासासाठी एसआयटी पथकात नवे दोन कर्मचारी वाढवले आहेत. आंधळेच्या शोधासाठी केज मधील स्थानिक कर्मचारी पथकात समाविष्ट आहे, याबाबत गृहविभागाने आदेश काढले आहेत. राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाच्या महासंचालकांनी या पथकात एक पोलिस हवलदार आणि एक पोलीस नाईक याची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर पोलीस हवालदार राजू वंजारे आणि पोलीस नाईक अनिल मंदे यांचा एसआयटीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

कृष्णा आंधळे तपास यंत्रणेला सापडणं गरजेचं आहे. तो सापडला तर अनेक गोष्टी समोर येणार आहेत. त्याला मारण्यात आल्याचे देखील अनेकांची सांगितले आहे, तो जिवंत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्याच्याकडे महत्त्वाचे पुरावे असण्याची शक्यता धनंजय देशमुख यांनी वर्तवली होती. मात्र, कृष्णा आंधळे याचा थांगपत्ता अद्याप कोणाला सापडला नाही.

दरम्यान, राज्य सोडून दुसऱ्या राज्यात, दुसरं राज्य सोडून तिसऱ्या राज्यात किंवा आणखी नेपाळ वैगरे अशा ठिकाणी गेला आहे का? याचा तपास सुरु आहे. तो सध्या फरार आहे. कृष्णा आंधळेला अटक झाली पाहिजे, हा आरोपी आहे, असं आमदार सुरेश धस म्हणाले होते. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला चार महिन्यांचा कालावधी उलटला आहे.

सीआयडीने दोषारोपपत्र दाखल केले असून मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला केले आहे. या प्रकरणात 9 आरोपी असून आठ जणांना अटक झाली आहे. मात्र, कृष्णा आंधळे कधी सापडणार? असा प्रश्न कायम आहे. यामुळे तो सापडला तर आरोपींना शिक्षा देणे अजून सोप्प होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!