भारतात आणखी 12 चित्त्यांची होणार एन्ट्री, साऊथ आफ्रीकेला एक डझन चित्त्यांची ऑर्डर…!
मुंबई : सध्या भारताने दक्षिण आफ्रीकेशी एक करार केला आहे. यामध्ये आफ्रिकन चित्त्यांची डझनभर ऑर्डरच भारताने दक्षिण आफ्रिकेला दिली आहे. पुढच्या महिन्यात भारतात आणखी 12 चित्त्यांची एन्ट्री होणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्यावर्षी भारतात चित्त्यांचे आगमन झाले होते. याची देखील मोठी चर्चा झाली होती. 12 चित्त्यांची पहीली तुकडी फेब्रुवारी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात पाठवण्यात येणार असल्याचे दक्षिण आफ्रिकेच्या पर्यावरण विभागाने एका निवेदनात म्हटले आहे.
तसेच पुढील आठ ते 10 वर्षांसाठी दरवर्षी आणखी 12 चित्त्यांची भारतात पाठवणूक करण्याची योजना आहे. नामिबियाहून गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात विशेष बोईंग 747-400 या विमानाने मध्यप्रदेशच्या ग्वालेर येथे चित्ते दाखल झाले होते.
नामिबियाची राजधानी विंडहॉक येथून 8 चित्ते आणण्यात आले होते. यात आठ चित्त्यांमध्ये 5 मादी आणि 3 नर चित्ते आहेत. दोन वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टाने नामिबियातून चित्ता आणण्यास ग्रीन सिग्नल दिला होता.
दरम्यान, सध्या या चित्ता प्रोजेक्टसाठी सरकारने 91 कोटींचे बजेट ठेवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांना कुनो राष्ट्रीय अभयारण्यात सोडण्यात आले. कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्त्यांसाठी विशेष सुविधा उभारण्यात आली आहे