पुणे महापालिका निवडणुकीसाठी 1165 उमेदवार रिंगणात; या’ 15 जागेवर तगड्या लढती?कोणा -कोणात लढत रंगणार?

पुणे :राज्यात महानगरपालिका निवडणूकीच बिगुल वाजल असून सर्व राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.पुणे महापालिका निवडणुकीसाठी एकूण 1165उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 41 प्रभागात 165 नगरसेवक पदांसाठी निवडणूक पार पडत आहे. यामध्ये 15 प्रभागामध्ये होणारी लढत चुरशीची ठरणार आहे.
पुण्यातील कोणत्या 15 जागेवर तगड्या लढती?
प्रभाग ५ (कल्याणीनगर – वडगाव शेरी) मध्ये भाजपचे नारायण गलांडे आणि राष्ट्रवादीचे सचिन भगत यांच्यात मोठी फाईट होणार आहे.

प्रभाग ७ (गोखलेनगर- वाकडेवाडी) मध्ये भाजपच्या रेश्मा भोसले विरुद्ध राष्ट्रवादीचे दत्ता बहिरट यांच्यात चुरशीचा मुकाबला होणार आहे.

प्रभाग ८ (औंध, बोपोडी) मध्ये भाजपचे सनी निम्हण आणि राष्ट्रवादीचे प्रकाश ढोरे एकमेकांसमोर उभे ठाकले असून, येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
प्रभाग ९ (सूस, बाणेर, पाषाण) मध्ये भाजपचे गणेश कळमकर विरुद्ध राष्ट्रवादीचे बाबूराव चांदेरे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.
प्रभाग ९ मध्येच दुसरीकडे लहू बालवडकर (भाजप) आणि अमोल बालवडकर (राष्ट्रवादी) या दोन युवा नेत्यांमध्ये सत्तेचा संघर्ष असणार आहे.
प्रभाग १२ (शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी) मध्ये निवेदिता एकबोटे (भाजप) आणि बाळासाहेब बोडके (राष्ट्रवादी) यांच्यात थेट लढत निश्चित झाली आहे.
प्रभाग १४ (कोरेगाव पार्क, मुंढवा) मध्ये उमेश गायकवाड (भाजप), सुनील ऊर्फ बंडू गायकवाड (राष्ट्रवादी) आणि बाबू वागस्कर (मनसे) यांच्यात त्रिशंकू मॅच रंगणार आहे.
प्रभाग १८ (वानवडी-साळुंखेविहार) मध्ये काँग्रेसचे प्रशांत जगताप आणि भाजपचे अभिजित शिवरकर यांच्यात लढत रंगणार आहे.
प्रभाग २४ (कसबा, कमला नेहरू रुग्णालय) भागात भाजपचे गणेश बिडकर आणि शिवसेनेचे प्रणव धंगेकर यांच्यात हायव्होल्टेज लढत होणार आहे.
प्रभाग ३६ (सहकारनगर, पद्मावती) मध्ये राष्ट्रवादीचे सुभाष जगताप विरुद्ध भाजपच्या वीणा गणेश घोष यांच्यात चुरशीचा सामना होणार आहे.
प्रभाग ३६ मध्येच दुसऱ्या गटात भाजपचे महेश वाबळे आणि शिवसेनेचे आबा बागूल यांच्यात जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे.
प्रभाग ३८ (बालाजीनगर, आंबेगाव, कात्रज) मध्ये राष्ट्रवादीचे दत्तात्रेय धनकवडे आणि भाजपचे संदीप बेलदरे यांच्यात चुरस निर्माण झाली आहे.
प्रभाग ३८ मध्येच प्रकाश कदम (राष्ट्रवादी), वसंत मोरे (ठाकरे सेना), स्वराज बाबर (शिवसेना) आणि व्यंकोजी खोपडे (भाजप) यांच्यात बहुरंगी फाईट होणार आहे.
प्रभाग ४० (कोंढवा बुद्रूक, येवलेवाडी) मध्ये भाजपच्या रंजना टिळेकर विरुद्ध राष्ट्रवादीचे गंगाधर बधे असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.
प्रभाग २३ (नाना पेठ, रविवार पेठ) मध्ये शिवसेनेच्या प्रतिभा धंगेकर आणि राष्ट्रवादीच्या सोनाली आंदेकर यांच्यात प्रतिष्ठेची मॅच रंगणार आहे.
दरम्यान पुण्यात काही ठिकाणी दोन माजी नगरसेवक एकमेकांच्या समोरासमोर आले आहेत. तर काही ठिकाणी बंडखोरी करून अन्य पक्षात गेलेल्या उमेदवारांनी आव्हान उभे केलं आहे. त्यामुळे एकूण 15 जागांवर उमेदवारांमधील लढतीचा थरार असणार आहे.
