महायुतीचे २३२ नाही फक्त ११० उमेदवार निवडून आलेत, अजितदादांचा तर २० हजारांनी पराभव झालाय, उत्तमराव जानकरांनी सगळं गणितच सांगितलं…


बारामती : राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळालं. तसेच महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. यामुळे ईव्हीएम मशीन मध्ये गडबड झाली आहे का? असा आरोप विरोधकांनी केला. अनेक ठिकाणी याबाबत तक्रारी आल्या यामुळे याची चर्चा सुरू आहे.

आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी राज्यात विधानसभेला महायुतीचे 232 नाही तर फक्त 110 आमदार निवडून आले आहेत. बाकीचे ईव्हीएम घोटाळा करून निवडून आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच अजित पवार यांचा 20000 मतांनी खरा पराभव झाला असल्याचे देखील जानकर यांनी सांगितले आहे.

यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. उत्तमराव जानकर म्हणाले, दोनास एक अशी गडबड ईव्हीएम मध्ये झाली. यामुळे आमचे उमेदवार पराभूत झाले. याबाबत गणित केले तर योगेंद्र पवार यांची 60000 मते वाढत असून अजित दादांचा 20000 मतांनी खऱ्या अर्थाने पराभव झाला आहे. अजित पवार यांचे 12 शिंदे गट 17 आणि भाजप 77 असे 110 आमदार फक्त भाजप महायुतीचे निवडून आले आहेत.

याबाबत दावा त्यांनी केला, यामुळे ईव्हीएम बाबत जागृती करणे गरजेचे असल्याचे देखील उत्तमराव जानकर यांनी म्हटले आहे. यामुळे त्यांच्या मतदारसंघात देखील मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात आले. येणाऱ्या काळात हे आंदोलन अजून तीव्र केले जाणार असल्याचे देखील उत्तमराव जानकर यांनी सांगितले आहे.

दरम्यान, उत्तमराव जानकर यांच्या मतदार संघात याबाबत मोठा घोळ झाल्याचा दावा केला जात आहे. याठिकाणी शरद पवार तसेच महाविकास आघाडीचे मोठे नेते जाऊन आले असून त्यांनी आंदोलन देखील केले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!