गोव्याला फिरायला जायला पैसे नव्हते म्हणून दहावीतील पोरींनी घरातले दागिने विकले, बॉयफ्रेंडला घेतलं अन्…: बातमी वाचून मन सुन्न होईल


अहमदाबाद : येथून दहावीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचे एक अल्पवयीन मुलगा आणि एका तरुणाबरोबर प्रेम झालं. या प्रेमाचे रूपांतर पुढे नको त्याच गोष्टीत होत गेले. या दोघी त्या दोन तरुणांबरोबर शाळेचा दिवस बुडवून बाहेर एकांतात फिरू लागल्या. त्यांना शाळा आणि बाहेरील क्लास बुडत आहेत. याची जराही पर्वा नव्हती.

एक दिवस त्यांनी गोव्याला फिरायला जायचे ठरवले. मात्र यासाठी मोठा खर्च येणार होता. मग यासाठी पोरांनी आयडिया दिली. पोरींनी मनोमन ऐकली. शहरातील एसजी महामार्गाजवळ राहणाऱ्या आणि सीबीएसई माध्यमातून दहावीत शिकणाऱ्या या मुली घरी गेल्या. आणि ठरलेल्या प्लॅननुसार काम करायला सुरुवात केली.

त्यानी घरातून दागिने आणि पैसे चोरले आणि ते चौघे अहमदाबादवरून निघाले. पहिल्यांदा मुंबईत पोचले. तिथे दागिने विकून 70 हजार रुपये मिळाले. ते 70 हजार रुपये घेऊन हे चौघेही गोव्याला गेले. याठिकाणी त्यांनी एकत्र राहत मौज मजा केली. यामध्ये सगळे पैसे उडवले.

नंतर या दोन मुली घरी परतल्या नाहीत म्हणून पालकांनी पोलिसांकडे त्या बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली. पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर या मुली कोणाच्या संपर्कात होत्या त्याचा शोध पोलिसांनी घेतला आणि दोन मुलांची माहिती मिळाली. तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. ही मुलगी सोशल मीडियावर कोणाशी बोलते हे लक्षात घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर लक्ष ठेवले आणि तेव्हा ही चौघेही गोव्यात असल्याचे पुढे आले.

नंतर पोलिसांनी पथक पाठवून बरोबर दोघांना ताब्यात घेतले. अहमदाबादला आणले आणि सारे कांड समोर आले. दरम्यान, सज्ञान असलेल्या युवकावर पोलिसांनी कारवाई केली तर दोन मुलींसह तिघा जणांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले. या घटनेने मात्र कुटूंबाला मोठा धक्का बसला असून त्यांच्या प्रेम प्रकरणाबाबत घरच्यांना काहीही माहिती नव्हती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!