घाई करा! जिओच्या रिचार्जवर मिळतोय १००० रुपयांचा कॅशबॅक, जाणून घ्या…
जिओ : युजर्सना नेहमीच अनेक ऑफर्स देत असते, ज्याचा ग्राहकांना मोठ्या प्रमाणात लाभ घेता येईल. अशात तुम्ही Jio युजर्स असाल तर, तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. कारण, जिओ रिचार्जवर उत्तम कॅशबॅक आणि रिवॉर्ड्स ऑफर करत आहे. जिओ रिचार्जवर जास्तीत जास्त १००० रुपयांची कॅशबॅक सूट देत आहे.
नवीन वर्षासाठी ५ दिवस बाकी असून ही ऑफर ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत सुरू राहणार असून ऑफर केवळ PhonePe, Amazon, Paytm आणि Mobikwik च्या डिजिटल वॉलेट आणि ॲप युजर्ससाठी आहे.
जर तुम्ही जिओ यूजर असाल तर तुम्हाला यासाठी तुमचा जिओ नंबर रिचार्ज करावा लागेल. यासाठी तुम्हाला Mobikwik, TatNeu सारखे ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्म वापरावे लागतील. तुम्ही जिथेही तुमचा Jio नंबर रिचार्ज कराल तिथे तुम्हाला १००० रुपयांची कॅशबॅक ऑफर मिळेल. आम्ही तुम्हाला सांगतो की ही ऑफर जिओच्या सर्व प्लॅनवर लागू आहे
त्याचबरोबर तुम्ही PhonePe द्वारे Jio नंबर रिचार्ज केल्यास, तुम्हाला जास्तीत जास्त ४०० रुपयांचे बक्षीस दिले जात आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की ही ऑफर पहिल्या आणि तिसऱ्या रिचार्जवर लागू होईल. यासाठी जिओ रिचार्ज फोनपे ॲपपवरून करावे लागेल.
त्याचप्रमाणे तुम्ही पेटीएम ॲप वापरून तुमचा मोबाइल रिचार्ज केल्यास, तुम्हाला जास्तीत जास्त रु १००० चा कॅशबॅक मिळू शकेल. तुम्हाला १३०० रुपयांचे बक्षीस देखील मिळू शकते. यासाठी तुम्हाला JIOPTM आणि JIODEC कोड वापरावे लागतील.
Amazon Pay द्वारे २५० रुपयांचे बक्षीस दिले जात आहे, तर Mobikwik द्वारे जास्तीत जास्त २५० रुपयांची सुपरकॅश दिली जात आहे. TataNeu ॲपवरून रिचार्जवर ५० NeuCoins दिले जात आहेत. तुम्हाला Mobikwik ZIP ऑफरमध्ये २५ रुपयांचा कॅशबॅक मिळू शकेल. त्याचप्रमाणे Amazon वर ICICI बँक क्रेडिट कार्ड ऑफरवर २ टक्के सूट उपलब्ध आहे. Tata Neu HDFC बँक क्रेडिट कार्डमध्ये ५ टक्के निओ नाणी दिली जात आहेत.