निवडणुकीसाठी 3 कोटी खर्च करून 100बोकड…..; संजय गायकवाडांच्या वक्तव्याने खळबळ

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार कंबर कसले आहे डिसेंबर महिन्याच्या दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच आता शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.निवडणुकीसाठी तीन कोटी रुपयांपर्यंत खर्च होतो आणि काही ठिकाणी शंभर बोकडही कापावे लागतात असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे निवडणुकीतील अनैतिक पद्धती आणि मोठ्या प्रमाणात होणारा खर्च यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

पुढे बोलताना गायकवाड म्हणाले, आता जिल्हा परिषद, पंचायत समिती,नगरपालिका आणि निवडणुका सोप्या राहिल्या आहेत का? एक-एक, दोन -दोन, तीन -तीन कोटी तर काही ठिकाणी 100 बोकड एका व्यक्तीकडून दिली जातात. इतक्या महाग निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उध्वस्त होतो. गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे निवडणुकीतील अनैतिक पद्धती आणि मोठ्या प्रमाणात होणारा खर्च यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकारणातील खर्चाबाबत चर्चा सुरू झाली आहे.
पुढे ते म्हणाले,आम्ही शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला प्राधान्य देणार आहोत. आम्हाला भाजप-शिवसेना युती पाहिजे आहे. ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे. कारण आम्ही विधानसभेला युती करतो. लोकसभेला युती करतो आणि ज्या वेळेस छोट्या कार्यकर्त्यांची गरज येते त्यावेळेस त्यांना आपण वाऱ्यावर सोडतो. त्यांनी पैसे खर्च करून काय मातीत जायचे आहे का? असा सवाल संजय गायकवाड यांनी यावेळी उपस्थित केला.
