रुद्राक्ष वाटपाच्या कार्यक्रमात 10 लाख भाविकांची गर्दी, महामार्ग ठप्प, अनेकजण बेपत्ता, काही जखमी…!


भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये सध्या रुद्राक्ष वाटप महोत्सवाची जोरदार चर्चा सुरू आहे. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सिहोर जिल्ह्यातील कुबेरेश्वर धाममध्ये शिव महापुराण कथा व रुद्राक्ष वाटप महोत्सवाला सुरुवात झाली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे दिसून आले आहे. 10 लाख भाविक यामध्ये आले होते.

यामुळे येथील रोड देखील जाम झाले होते. या गर्दीमध्ये काहीजण जखमी देखील झाले होते. गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पोलीस प्रशासन देखील याठिकाणी दाखल झाले होते.

दरम्यान, चक्कर आल्याने अनेक जण पडले. यावेळी अनेक महिला बेपत्ता असल्याची माहिती आहे. यामुळे त्यांचा शोध घेतला जात आहे. भोपाळ आणि इंदूर या दोन्ही ठिकाणांहून लोक सतत कुबेरेश्वर धामला पोहोचतात. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहानही दुपारी कुबेरेश्वर धामवर येऊ शकतात.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे उद्या (ता.18) येथे येणार आहेत. याठिकाणी मोठा पोलीसफाटा तैनात असताना देखील मोठा गोंधळ झाला. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाम येथे गुरुवारी रुद्राक्ष वाटप महोत्सवास सुरुवात झाली. शिव महापुराण कथाही सुरू झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!