दौंडमध्ये वारकऱ्यांना लुटून तरुणीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचे शर्तीचे प्रयत्न, १० पथकं तैनात, स्केचही जारी…


दौंड : दौंड परिसरात पंढरपूरच्या वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या टेम्पोवर मध्यरात्री लुटीची आणि एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. याठिकाणी दोन अज्ञात व्यक्तींनी टेम्पो थांबवून वारकऱ्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली, महिलांचे दागिने हिसकावले.

तसेच त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केले. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेमुळे सगळेच हादरले असून याबाबत आरोपींना पकडण्यासाठी सध्या पोलीस प्रयत्न करत आहेत. यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची दहा विशेष पथके सक्रिय झाली आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आता दोन्ही अज्ञात आरोपींचे स्केच तयार करण्यात आले आहेत. त्याद्वारे पोलीस आरोपींचा शोध घेत असून आरोपी इतर राज्यात पळाले असल्याचा संशय देखील आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी विशेष तपास पथके तयार केली आहेत.

तसेच या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन व तांत्रिक पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. ग्रामीण भागातील पूर्वीचे सराईत गुन्हेगार आणि संशयित व्यक्तींची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे एकच संताप व्यक्त केला जात आहे.

आरोपींचा लवकरात लवकर माग काढून कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. घटनेतील प्रत्यक्षदर्शीकडून याबाबत माहिती घेतली जात आहे. या घटनेत जास्त आरोपो सहभागी असल्याचे देखील सांगितले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!